MAHARASHTRA CENTRE FOR ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT

An Autonomous Society working under Directorate of Industries Government of Maharashtra

MAHARASHTRA CENTRE FOR ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT , WASHIM


LIVE STOCK MANAGEMENT (GOAT, POULTRY & DAIRY FARMING) TRAINING PROGRAMME WASHIM

Rs. 2360.00 Only

Included GST


From : 25/08/2026 To 29/08/2026
District/State : WASHIM
लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट (शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय) प्रशिक्षण कार्यक्रम – वाशिम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), वाशिम यांच्या वतीने बेरोजगार युवक-युवती, शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) तसेच पशुपालन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी ५ दिवसीय "लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट (शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय) प्रशिक्षण कार्यक्रम" आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये आधुनिक पद्धतीने शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय उभारणी, व्यवसाय नियोजन, गोठा/शेड व्यवस्थापन, पशुखाद्य नियोजन, रोग प्रतिबंधक उपाय, लसीकरण, आर्थिक नियोजन, शासनाच्या विविध अनुदान व कर्ज योजनांची माहिती तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाईल. कार्यक्रमाचा तपशील : प्रशिक्षण कालावधी: २५ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑगस्ट २०२६ कालावधी: ५ दिवस प्रवेश अर्जाची अंतिम तारीख: २४ ऑगस्ट २०२६ प्रशिक्षण शुल्क: ₹२,३६० (GST सहित) नोंदणी करते वेळी ऑफिसर कोड 104 (GAURAV INGLE) टाकावा. प्रशिक्षणार्थी संख्या: किमान ३० प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहभागींस MCED चे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच स्वतःचा पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक, आर्थिक व शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल. हा कार्यक्रम ग्रामीण भागातील युवक-युवती, शेतकरी, महिला बचत गट आणि स्वयंरोजगाराच्या संधी शोधणाऱ्या इच्छुकांसाठी अत्यंत उपयुक्त असून पशुपालन क्षेत्रात शाश्वत रोजगार निर्मितीस चालना देणारा आहे. LIVE STOCK MANAGEMENT (GOAT, POULTRY & DAIRY FARMING) TRAINING PROGRAMME WASHIM